Tue, Jul 16, 2019 11:38होमपेज › Goa › नामवंतांच्या मेणाच्या पुतळ्यांचे हडफडेत संग्रहालय

नामवंतांच्या मेणाच्या पुतळ्यांचे हडफडेत संग्रहालय

Published On: May 19 2018 1:31AM | Last Updated: May 18 2018 11:14PMपणजी : प्रतिनिधी

गोव्यात प्रथमच नामवंत बॉलिवूड कलाकार व राजकिय नेत्यांचे मेणाचे पुतळे असलेले संग्रहालय स्थापन करण्यात येत आहे. बेन्झ अम्युझमेंट पार्क प्रा. लिमिटेड या कंपनीतर्फे उभारण्यात आलेल्या या संग्रहालयाचे हडफडे  येथे 20 मे रोजी संध्याकाळी 4 वा.  राज्यपाल मृदुला सिन्हा, आयुष मंत्री श्रीपाद नाईक व माजी आमदार राजेंद्र आर्लेकर यांच्या उपस्थितीत   उदघाटन होणार आहे, अशी माहिती ‘बेन्झ’चे मालक प्रकाश दळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

दळवी म्हणाले, मेणापासून बनलेले निवडक व्यक्तींचे पुतळे संग्रहालयात पहायला मिळतील. यात महानायक अमिताभ बच्चन, अभिनेते आमीर खान,  बाहुबली, कटप्पा, अनुष्का शर्मा, महात्मा गांधी, विराट कोहली अशा अनेक नामवंत व्यक्तींच्या  पुतळ्यांचा समावेश असेल. त्याचबरोबर याठिकाणी 9 डी सिनेमा व डॅशिंग कार चा ही आनंद लुटण्याची संधी  गोवेकरांना मिळणार आहे. बेन्झतर्फे यासारखे संग्रहालय, लोणावळा व महाबळेश्‍वर येथे उभारण्यात आले असून गोव्यातील त्यांचे हे  तिसरे संग्रहालय आहे. मेणाचे पुतळे बनविण्यावर खास लक्ष देण्यात आले असून आवडीच्या व नामवंत व्यक्तीचे  पुतळे याठिकाणी पहायला मिळतील. राष्ट्रीय स्तरावरील कलाकार हे पुतळे बनविणार असून  पुतळ्यांची संख्या   वाढविली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.  प्रतिक दळवी म्हणाले, संग्रहालयाला भेट देणार्‍यास   तसेच 9 डी सिनेमा व डॅशिंग कारचा आनंद लुटण्यासाठी शुल्क आकारले जाईल.