Tue, Mar 19, 2019 05:13होमपेज › Goa › राणेंचे वादग्रस्त वक्तव्य; काँग्रेसने मागितली माफी!

राणेंचे वादग्रस्त वक्तव्य; काँग्रेसने मागितली माफी!

Published On: Aug 07 2018 1:16PM | Last Updated: Aug 07 2018 1:39PMपणजी: पुढारी ऑनलाईन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या वादग्रस्त विधानावर पक्षाने माफी मागितली आहे. गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीष चोडणकर यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे. 

गोव्यातील जे लोक परदेशात नोकरी करतात ते शौचालय साफ करण्याचे काम करतात, असे वादग्रस्त विधान प्रतापसिंह राणे यांनी केले होते. राणे यांच्या विधानावर अनेकांनी टीका केली होती. आता त्यांच्या या विधानावर पक्षाने माफी मागितली आहे. राणे याचे वक्तव्य चुकीचे आणि अनावश्यक असल्याचे पक्षाने म्हटले आहे. कोणतेही काम वा कोणतीही व्यक्तीच्या विरोधात अमानजनक वक्तव्य करणे हे काँग्रेसच्या संस्कृतीच्या विरुद्ध असल्याचे प्रदेश अध्यक्ष चोडणकर यांनी सांगितले. 

पक्षाने यासंदर्भात राणे यांना वक्तव्य मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. गोव्यातील लोक जगात जेथे कुठे जातात तेथे त्यांनी तो देश समृद्ध केला आहे. गोव्यातील अनेक लोक परदेशात कॉर्पोरेट, सरकारी त्याच बरोबर सैन्य आणि शिक्षण क्षेत्रात उच्च पदावर काम करत आहेत, असे चोडणकर म्हणाले.