Mon, May 20, 2019 10:44होमपेज › Goa › मगोच्या केंद्रीय समितीस दोन वर्षांची मुदतवाढ

मगोच्या केंद्रीय समितीस दोन वर्षांची मुदतवाढ

Published On: Dec 14 2017 1:44AM | Last Updated: Dec 14 2017 12:29AM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची (मगोप) रविवारी (दि. 17) आयोजित केलेली आमसभा काही अपरिहार्य कारणामुळे एका आठवड्याने पुढे ढकलली असून आता ही आमसभा दि. 24 डिसेंबर रोजी होणार आहे. केंद्रीय समितीस दोन वर्षांची मुदतवाढ देण्याचा ठराव घेण्यात आल्याची माहिती मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी बुधवारी दिली.

मगोच्या रविवारी (दि.17) नियोजित आमसभेत केंद्रीय समितीची नव्याने निवडणूक घेतली जाणार होती. मात्र, या विषयावरून वाद झाल्याने आमसभा गाजण्याची शक्यता होती. बहुतांश केंद्रीय समितीच्या सदस्यांच्या मते समितीची मुदत तीन वर्षांनी संपुष्टात आल्यावर नव्याने निवडणूक घेणे आवश्यक आहे. दुसर्‍या एका गटाने  समितीला दोन वर्षांची मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. बैठकीत समितीचीमुदत डिसेंबर 2017 मध्ये संपुष्टात आली असली तरी  नव्याने निवडणूक न घेता दोन वर्षांची मुदतवाढ द्यावी, असा ठराव घेण्यात आला.