होमपेज › Goa › शिवोलीत गांजा लागवडीचा पर्दाफाश; दोन रशियन अटकेत

शिवोलीत गांजा लागवडीचा पर्दाफाश; दोन रशियन अटकेत

Published On: Jul 22 2018 1:02AM | Last Updated: Jul 21 2018 11:57PMपणजी : प्रतिनिधी

गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी  केलेल्या दोन वेगवेगवेळ्या  कारवायांत शिवोली येथील गांजाच्या लागवडीचा पर्दाफाश केला. या कारवाईत  पोलिसांनी  30 किलो गांजा  जप्‍त करून मॅक्झिम मोस्कीशेव व  आर्टेम सेरेगन या रशियन नागरिकांना अटक केली. जप्‍त करण्यात आलेल्या गांजाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत  10 लाख रुपये इतकी आहे. 

संशयित रशियन नागरिक हे शिवोली येथे भाड्याच्या जागेत गांजा पिकवत असल्याची माहिती गुन्हा   अन्वेषण विभागाच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार प्राप्‍त माहितीच्या आधारे  पोलिसांनी   गांजाच्या शेतीवर कारवाई  केली.

मॅक्झिम मोस्कीशेव व आर्टेम सेरेगन यांच्या विरोधात पोलिसांनी  अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हे नोंद केले आहेत. संशयितांची कसून चौकशी केली जात आहे. त्यांना पोलिस कोठडीत पाठवण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.