Sun, Jul 21, 2019 01:26होमपेज › Goa › ट्रक-कार अपघातात महिला जागीच ठार

ट्रक-कार अपघातात महिला जागीच ठार

Published On: Dec 06 2017 1:46AM | Last Updated: Dec 06 2017 12:27AM

बुकमार्क करा

फोंडा : वार्ताहर 

अनमोड घाट येथील दूधसागर मंदिराजवळील धोकादायक वळणावर मंगळवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास कार व मालवाहू ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात कारमधील हबीबा अब्दुल करीम (वय 60, बेळगाव) या जागीच ठार झाल्या. इरफान अब्दुल करीम (52) व त्यांची पत्नी नझारीन इरफान अब्दुल (48) व मुलगा शोहीब इरफान (19) हे तिघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात उपचार चालू आहेत.

कुळे पोलिसांनी ट्रकचालक आवाज अब्दुल रियाझ शेख (दांडेली-कर्नाटक) याला अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी कार (केए-31-8520) मोलेहून बेळगावच्या दिशेने जात होती. विरुद्ध दिशेने येणार्‍या ट्रकची (एमएच-14 एएम-9982) व कारची समोरासमोर धडक झाली. यात कारमधील हबीबा या जागीच ठार झाल्या, तर त्यांचे बंधू इरफानसह अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले. त्यांना प्राथमिक उपचारासाठी पिळये आरोग्य केंद्रात नेण्यात आले. त्यांची प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना पुढील उपचारासाठी गोमेकॉ इस्पितळात नेण्यात आले. निरीक्षक नीलेश धायगोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रफुल्‍ल गिरी यांनी अपघाताचा पंचनामा केला.