Sat, Jan 19, 2019 15:47



होमपेज › Goa › कोलव्यात टॅक्सी व्यावसायिकाचा खून

कोलव्यात टॅक्सी व्यावसायिकाचा खून

Published On: Jan 22 2018 1:25AM | Last Updated: Jan 21 2018 11:15PM



मडगाव : प्रतिनिधी 

कोलवा येथील टॅक्सी मालक बाप्तिस्ता डिकॉस्टा उर्फ भातू (वय 53) याचा मृतदेह गळा चिरलेल्या स्थितीत अर्धनग्न अवस्थेत  बेताळभाटी येथील लव्हर्स पॉईंट किनार्‍यावर सापडला. धारदार शस्त्राने त्याचा गळा चिरून अज्ञाताने खून केल्याचे उघडकीस आल्याने रविवारी सासष्टीत खळबळ उडाली. 

आर्थिक व्यवहारातून हा प्रकार  झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून  या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात  खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.कोलवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाप्तिस्ताचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत बेतालभाटी   किनार्‍यावर पडून असल्याची माहिती रविवारी सकाळी त्यांना मिळाली. घटनास्थळापासून सुमारे दोनशे मीटर अंतरावर त्याची मारूती व्हॅन पार्क करून ठेवण्यात आली होती. पोलिस निरीक्षक फिलोमेन कॉता यांनी दिलेल्या माहितीनुसार चाकू किंवा सुर्‍याने त्याचा गळा चिरून खून करण्यात आलेला आहे. घटनास्थळी संपलेले जेवण, बियरच्या बाटल्या आदींवरून त्या ठिकाणी रात्री बाप्तिस्ता याच्यासह  अन्य काही लोक असू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.