Fri, Jan 18, 2019 10:54होमपेज › Goa › ताळगावसाठी नवा बाह्य विकास आराखडा

ताळगावसाठी नवा बाह्य विकास आराखडा

Published On: Mar 14 2018 1:25AM | Last Updated: Mar 14 2018 1:15AMपणजी : प्रतिनिधी

 ताळगावचा नवा बाह्य विकास आराखडा (ओडीपी)  तयार करण्याचा निर्णय नव्याने स्थापन झालेल्या ग्रेटर पणजी पीडीएच्या मंगळवारी (दि.13) झालेल्या पहिल्या बैठकीत  झाला. ग्रेटर पणजी पीडीएचे अध्यक्ष बाबूश मोन्सेरात यांच्या अध्यक्षतेखाली   सकाळी ही बैठक पार पडली.  मोन्सेरात म्हणाले, ग्रेटर पणजी पीडीएच्या पार पडलेल्या बैठकीत   ताळगावचा नव्याने ओडीपी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.  यासाठी ताळगाव येथील जमीन वापराबाबतचा नकाशा तयार करण्याचे काम    लवकरच हाती घेण्यात येईल.सदर नकाशा तयार झाल्यानंतर तो तेथील जनतेच्या सूचना तसेच शिफारशींसाठी  खुला ठेवला जाणार असल्याचेही  यावेळी त्यांनी सांगितले. 

सरकारकडून गेल्या महिन्यात ग्रेटर पणजी पीडीए स्थापन करण्यात आली. यात ताळगाव, बांबोळी, कंदबा पठाराबरोबर सांताक्रुझ व सांत आंद्रेतील 14  गावांचा  विकास तसेच नियोजनासाठी समावेश करण्यात आला आहे. मात्र, या पीडीएतून सांताक्रुझ व सांत आंद्रेला वगळण्यात यावे, अशी मागणी या दोन्ही मतदारसंघांतील रहिवाशी करीत आहेत.