Mon, Apr 22, 2019 01:48होमपेज › Goa › फिरत्या विक्रेत्यांवर कारवाई करा

फिरत्या विक्रेत्यांवर कारवाई करा

Published On: May 30 2018 2:17AM | Last Updated: May 29 2018 11:14PMपणजी : प्रतिनिधी

पणजी मार्केटच्या बाहेर बसून फळे आणि भाज्यांची विक्री करणार्‍यां फिरत्या विक्रेत्यांविरोधात    कारवाई करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसतर्फे महापौर विठ्ठल चोपडेकर आणि आयुक्‍त अजित रॉय यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.यासंदर्भातील निवेदन काँग्रेसने महापौरांना सोमवार दि. 28 मे रोजी दिले. पणजी मार्केटच्या बाहेर बसणार्‍या विक्रेत्यांवर त्वरीत कारवाई करून  मार्केटमधील सोपोकर विक्रेत्यांना दिलासा दिला जाईल, असे आश्‍वासन आयुक्‍त रॉय यांनी दिले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने हे निवेदन सादर केले. यावेळी पणजी मार्केटमधील भाजी विक्रेत्या महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.चोडणकर म्हणाले, की काहीजण मार्केट बाहेर फळे आणि भाजी विक्री करत असल्याने मार्केटमधील विक्रेत्यांवर त्याचा परिणाम होत आहे.  ग्राहक बाजारात जाण्याएवजी बाहेरुनच   या विक्रेत्यांकडून फळे अथवा भाजी खरेदी करतात. मनपाने यावर कडक कारवाई करणे आवश्यक  आहे.  मार्केट बाहेर बेकायदेशीरपणे विक्रेते बसणे   योग्य नाही.

पणजी    मार्केट इमारतीत  वीजेची योग्य सुविधा नसून संकुलातील पंखे देखील व्यवस्थित चालत नाहीत.  याशिवाय स्वच्छतागृह असून देखील ते अत्यंत अस्वच्छ आहे. मनपाचे मार्केटच्या स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे   मार्केट मधील   विक्रेत्यांना   अडचण निर्माण होते.  याशिवाय आग प्रतिबंधात्मक  उपकरणेही नसल्याचे लक्ष यावेळी चोडणकर यांनी  वेधले. विक्रेत्यांना हटविण्यात येईलपणजी मार्केट बाहेर घाऊक विक्रेत्यांना सकाळी 9.30 वाजे पर्यंत  बसण्याची मुभा आहे. मात्र त्याबाहेर देखील जर विक्रेते   बसत असतील तर विक्रेत्यांवर कारवाई करुन त्यांना त्वरीत  हटवण्यात येईल. याशिवाय वीज तसेच पंखे सुुविधा पुरवण्याचे काम  हाती घेण्यात आले आहे, असे आयुक्त अजित रॉय यांनी सांगितले.