होमपेज › Goa › पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आत्मदहन करणार्‍यास अटक

पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आत्मदहन करणार्‍यास अटक

Published On: Feb 14 2018 2:51AM | Last Updated: Feb 13 2018 8:52PMसोलापूर : प्रतिनिधी

पंढरपूर पोलिसांच्या अन्यायास कंटाळून पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणार्‍या पंढरपूरच्या व्यक्तीस सदर बझार पोलिसांनी अटक केली. मोहन बबन जाधव (वय 52, रा. वाखरी, ता. पंढरपूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत  पोलिस   नाईक तुकाराम कोळी  यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आपल्या   कुटुंबावर  पंढरपूर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक धोत्रे यांनी अन्याय  केल्याच्या निषेधार्थ मोहन जाधव यांनी  सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास सोलापूर पोलिस अधीक्षक कार्यालयातील वाहनतळ येथे ‘मला आता जिवंत राहायचे नाही, माझ्यावर अन्याय झाला आहे’ असे मोठमोठ्याने  ओरडून पिशवीतून आणलेले रॉकेल अंगावर ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी जाधव यांना पकडून सदर बझार पोलिसांच्या स्वाधीन केले. याबाबत सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलिस उपनिरीक्षक गंपले तपास करीत आहेत.

बीएसएनएलची 40 हजारांची केबल चोरीस

बीएसएनएलची विजापूर रोडवरील कोर्ट कॉलनी येथून 40 हजार रुपये किंमतीची केबल चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत गौरीशंकर शरणप्पा पटणे (रा. सिध्देश्‍वर हौसिंग सोसायटी, भवानी पेठ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक कांबळे तपास करीत आहेत.