Thu, Apr 25, 2019 16:25होमपेज › Goa › कोलवातील खून लैंगिक अत्याचाराला कंटाळून 

कोलवातील खून लैंगिक अत्याचाराला कंटाळून 

Published On: Jan 24 2018 1:22AM | Last Updated: Jan 24 2018 1:22AMमडगाव : प्रतिनिधी

बेताळभाटी येथील लव्हर्स बीचवर अर्धनग्न अवस्थेत सापडलेल्या कोलवातील टॅक्सी व्यावसायिक बाप्तिस्ता डिकॉस्ता उर्फ भातू याच्या खुनाचा 48 तासांच्या आत छडा लावण्यात पोलिस पथकाला यश आले आहे. बाप्तिस्ताच्या खून प्रकरणात त्याचाच एक कर्मचारी अमन गोपाल कवितीया (वय 21,  मूळ रा. गुजरात) या युवकाला ताब्यात घेतले असून त्याने गेल्या अनेक दिवसांपासून होत असलेल्या लैंगिक अत्याचाराला कंटाळून बाप्तिस्ताचा खून केल्याचे कबूल केले आहे, अशी माहिती दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक अरविंद गावस यांनी दिली.

गावस यांनी सांगितले की, अमन याने पूर्ण तयारीनिशी हा खून केला आहे. नेहमीच्या लैंगिक अत्याचाराला कंटाळून अमन याने अखेर बाप्तिस्ता याचा सुर्‍याने गळा कापून खून केला. गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून ते दोघे एकमेकांच्या संपर्कात होते. संशयित अमनने बाप्तिस्ताकडून सहाशे रुपये उसने घेतले होते. काही दिवसांपूर्वी त्याच्या डिओ दुचाकीचा अपघात झाला होता आणि दुरुस्तीसाठी बाप्तिस्ताने त्याला मदत केली  होती. अमनने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार केलेल्या मदतीच्या बदल्यात बाप्तिस्ता त्याच्यावर नेहमी लैंगिक सुखासाठी दबाव आणत होता.