Fri, Jul 10, 2020 21:37होमपेज › Goa › हणजूण येथे सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

हणजूण येथे सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

Published On: Dec 13 2017 1:54AM | Last Updated: Dec 13 2017 12:47AM

बुकमार्क करा

म्हापसा : प्रतिनिधी  

हणजूण पोलिसांनी मंगळवारी संध्याकाळी  केलेल्या कारवाईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. या प्रकरणी संशयित फिलालाल जमाल शेख (मुंबई) या दलालास अटक करून आठ युवतींची सुटका केली.

हणजूण पोलिसांनी स्टारको जंक्शन येथे मंगळवारी कारवाई करून वेश्या व्यवसायासाठी वापरल्या जाणार्‍या दोन दुचाकी (जीए-8-यू-2673, जीए-8-यू-2674) या चौकशीसाठी थांबवल्या. त्यांची चौकशी केली असता, भाड्याने घेतलेल्या या दुचाकीवर संशयित फिलालाल व एक युवती आणि दुसर्‍या दुचाकीवर दुसरी युवती होती. पोलिसी खाक्या दाखवल्यावर संशयित दलालाने इतर युवतींची माहिती दिली. पोलिसांनी आठ युवतींना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी महिला सुधारगृहात केली. या प्रकरणी हणजूण पोलिस पुढील तपास करीत आहेत.