होमपेज › Goa › खाणबंदीवर तोडग्यासाठी आज मुख्यमंत्री दिल्लीला

खाणबंदीवर तोडग्यासाठी आज मुख्यमंत्री दिल्लीला

Published On: Aug 07 2018 12:59AM | Last Updated: Aug 06 2018 11:38PMपणजी : प्रतिनिधी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर मंगळवारी (दि. 7) दिल्लीत खाण संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेमलेल्या केंद्रीय मंत्र्यांच्या समितीची भेट घेणार आहेत. खाणसंबंधी 1987 सालच्या कायद्यात दुरुस्ती करून खाणी पुन्हा सुरू कराव्यात, असा विधानसभेत घेण्यात आलेला ठराव ते समितीसमोर मांडणार असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.  

त्यानंतर पर्रीकर आजारावरील दुसर्‍या टप्प्याचे उपचार घेण्यासाठी गुरूवारी (दि. 9) अमेरिकेला जाणार आहेत. पर्रीकरांना नियमित तपासणीसाठी न्यूयॉर्कला जावे लागणार असून ते नेमके कधी परतणार त्याची माहिती मिळाली नाही. मात्र येत्या 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री राज्यात उपलब्ध नसतील, असे सूत्रांनी सांगितले.