Fri, Nov 16, 2018 08:41होमपेज › Goa › शिवसेना गोव्यात स्‍वतंत्र लढणार : संजय राऊत 

शिवसेना गोव्यात स्‍वतंत्र लढणार : संजय राऊत 

Published On: Feb 26 2018 11:46AM | Last Updated: Feb 26 2018 11:46AMपणजी : प्रतिनिधी

शिवसेना गोव्यात स्वतंत्रपणे लोकसभा निवडणुका लढणार आहे. त्यादिशेने शिवसेनेकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख एप्रिल महिन्याच्या सुरवातीस गोवा दौर्‍यावर येणार असल्याची माहिती खासदार तथा गोवा प्रभारी संजय राऊत यांनी दिली. पणजीत आयोजित केलेल्‍या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

प्रवक्‍ते जितेश कामत यांना शिवसेनेच्या राज्यप्रमुखपदी बढती देण्यात आली आहे. कामत हे शिवसेना राज्यप्रमुख शिवप्रसाद जोशी यांच्या सोबत काम करतील. त्यामुळे गोवा शिवसेनेला आता दोन राज्यप्रमुख असतील असेही राऊत यांनी यावेळी सांगितले.