Tue, Apr 23, 2019 21:35होमपेज › Goa › साखळीत 20 हजारांची  हेल्मेटस् जप्त

साखळीत 20 हजारांची  हेल्मेटस् जप्त

Published On: Jan 17 2018 2:12AM | Last Updated: Jan 17 2018 1:53AM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

 साखळी येथे वजन व माप खात्याने कारवाई करुन 20 हजार रुपये किंमतीची 44 हेल्मेटस् जप्त केली.याशिवाय  गोवा डेअरी व सुमुलच्या  केरी व पर्ये  येथील दूध संकलन केंद्राविरोधातही गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  वजन व माप खात्याचे निरीक्षक नितीन पुरूषन  यांनी ही कारवाई  वजन व माप खात्याचे नियंत्रक  के.बी  कोसंबे व  सहाय्यक  नियंत्रक  पी.एस. शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली  केली.  निरीक्षक गुलाम गुलबर्ग व  देवानंद फडते व गुरुनाथ नाईक यांनी यात सहकार्य केले.

गोवा डेअरी व सुमुलच्या  केरी व पर्ये  येथील दूध कलेक्शन सेंटर,  पिसूर्ले  औद्योगिक वसाहतीत असलेल्या एका दूग्धोत्पादक कंपनीत न्यताप्राप्त नसलेला  अनधिकृत वजनकाटा वापरल्याप्रकरणी  या तिघांविरोधात वजन व माप खात्याने गुन्हा नोंद केला आहे.  साखळी येथील एका हेल्मेट विक्री दुकानात   हेल्मेट पॅकिंग केलेल्या  बॉक्सेसवर  कंपनीने हेल्मेटच्या उत्पादनाचा महिना तसेच  वर्ष याबाबत काहीच माहिती नमूद केलेली नसल्याचे आढळून आल्याने  हेल्मेटस्चे 44 बॉक्स जप्त करण्यात आले.  वजन व माप  कायदा 2009 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.