Tue, Mar 26, 2019 01:35होमपेज › Goa › अष्टमीची फेरी उद्यापासून  

अष्टमीची फेरी उद्यापासून  

Published On: Sep 01 2018 1:45AM | Last Updated: Aug 31 2018 11:46PMपणजी : प्रतिनिधी

गणेश चतुर्थीनिमित्त पणजीत भरणार्‍या अष्टमी फेरीला रविवार दि. 2 सप्टेंबरपासून मांडवी तीरावर सुरुवात होणार आहे. फेरीसाठी दुकाने थाटण्याचे काम सुरू असून दुकानांसाठी महानगरपालिकेकडे आतापर्यंत 119 अर्ज आल्याची माहिती महापौर विठ्ठल चोपडेकर यांनी  दिली. अष्टमीच्या फेरीची तयारी  मनपाकडून हाती घेण्यात आली आहे.  मनपाकडून काल शुक्रवारी मांडवी तीरावर  दुकानांची जागा निश्‍चित करण्यात आल्यानंतर दुकानदारांनी दुकाने थाटण्याचे काम उशिरा सुरू केले. 

महापौर चोपडेकर म्हणाले, अष्टमीची  फेरी 1 ते  15 सप्टेंबर या काळात होणार आहे. मात्र दुकाने थाटण्याबरोबर अन्य  तयारी पाहता ही फेरी 2 सप्टेंबरपासूनच  पूर्ण क्षमतेने सुरू होईल. लाकडी साहित्य, फर्निचर, देवपूजेचे साहित्य, चादरी, माटोळीचे साहित्य आदी मिळून सुमारे 119 दुकानदारांनी अर्ज केला आहे. मनपा आयुक्‍त अजित रॉय हे अष्टमी फेरी संदर्भातील सर्व काम जातीने पहात असल्याचे त्यांनी  सांगितले. 

अष्टमीच्या फेरीत स्टॉल्स किंवा दुकाने  उभारणार्‍या दुकानदारांना यंदा  प्रती मीटर 30 रुपये इतके शुल्क लागू  करण्यात आले आहे. मागीलवर्षी  दुकानदारांकडून आकारण्यात येणार्‍या शुल्कावरुन गोंधळ  झाल्यानंतर मनपाने यावर्षी  दर निश्‍चित केले आहेत.