Fri, Jul 19, 2019 20:00होमपेज › Goa › राज्यातील मद्यविक्रेत्यांचे परवाने नूतनीकरण होणार

राज्यातील मद्यविक्रेत्यांचे परवाने नूतनीकरण होणार

Published On: Apr 19 2018 1:34AM | Last Updated: Apr 19 2018 1:34AMपणजी : प्रतिनिधी
राज्यातील सर्व म्हणजे 1 हजार 300 मद्यालयांना विक्री परवाने मिळण्याची शक्यता आहे. त्रिमंत्रीय समितीने घेतलेल्या निर्णयाची कार्यवाही सुरू झाली आहे. परवान्यांचे नूतनीकरण करून देण्यासाठी अबकारी खात्याने प्राथमिक प्रक्रीया  सुरू केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

सर्वोच्च न्यायालयाने महामार्गाच्या बाजूची सगळीच मद्यालये बंद करण्याच्या पहिल्या आदेशानंतर काही अटींवर मद्यविक्रेत्यांना दिलासा दिला होता. यासाठी प्रत्येक राज्य सरकारला मद्यविक्रीबाबत अधिकार दिल्यानंतर, गोव्यात मंत्री फ्रान्सिस डिसोझा, विजय सरदेसाई आणि रोहन खंवटे यांच्या त्रिमंत्रीय समितीने काही मार्गदर्शक तत्त्वे व निकषांच्या चौकटीत राहून सर्वच मद्यालये नव्याने खुली करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या समितीच्या एकूण चार बैठका घेताना,  न्यायालयीन आदेशाच्या चौकटीत राहून काही निकष तयार केले. प्रथम एक हजार मद्यालये खुली होण्याचा मार्ग मोकळा केला.  मग उर्वरित तीनशे ते साडेतीनशे मद्यालयांचा प्रश्‍न हाती घेतला. राज्यातील विविध पीडीएच्या क्षेत्रात येणारी मद्यालये सुरू करण्यासही मान्यता देताना काही निकष निश्‍चित केले.  

अबकारी खात्याने या त्रिमंत्रीय समितीने सूचवलेल्या निकषानुसार बैठकीचे इतिवृत्त तयार केले. या इतिवृत्तावर मंत्री डिसोझा, मंत्री खंवटे व मंत्री सरदेसाई यांच्या सही घेतल्यानंतर अबकारी खात्याने पुढील प्रक्रिया सुरू केली आहे. पान 2 वर 

यामुळे न्यायालयीन आदेशामुळे ज्या 1 हजार 300 मद्यालयांवर कायमची बंदी आली होती, ती आता महिन्याभरात खुली होणार आहे. काही ठिकाणी जाऊन अबकारी खात्याचे अधिकारी ती मद्यालये नेमकी कुठे आहेत, याची पाहणीही करतील. हे काम पंधरा दिवसांत होईल. मे महिन्यातच अनेक मद्यालयांना प्रत्यक्ष परवानेही मिळतील, असे अबकारी खात्याच्या एका अधिकारी सूत्राने सांगितले.