गोवा : 'स्विगी, झोमॅटो कामगारांना संरक्षणासाठी साहित्य द्या' 

Last Updated: Apr 10 2020 5:37PM
Responsive image
संग्रहित छायाचित्र


पणजी : पुढारी वृत्तसेवा 

गोवा राज्यात स्विगी व झोमॅटोतर्फे जीवनावश्यक सेवा पुरविणार्‍या कामगारांवर कामाचा दबाव टाकला जात आहे. तसेच त्यांच्या पगारात कपात केली जात असल्याने या विषयात लक्ष घालावे, अशी मागणी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनतर्फे (सीआयटीयू) सरकारकडे केली आहे.

वाचा :  गोव्यातील काँग्रेसचे आमदार वेतनातील ३० टक्के रक्कम मदत निधीसाठी देणार

राज्यात सध्या स्विगी व झोमॅटो कंपनीच्या घरपोच सेवा देणार्‍या डिलीव्हरी कामगारांवर कामाचा अती ताण दिला जात आहे. हॉटेलातील खाद्य पदार्थांची घरपोच सेवा देताना या कंपन्या सध्या लॉकडाऊनमुळे किराणा साहित्याची देखील घरपोच सेवा देत आहेत. तसेच या कामगारांना खासगी संरक्षणासाठी साहित्य दिले नसल्याचे सीआयटीयुकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे. 

व्यवसाय चालविण्यासाठी अन्न पदार्थांचे दर कमी केल्याने, कामगारांच्या पगारात देखील कपात केली आहे, असे  सीआयटीयूचे सरचिटणीस जतीन नाईक यांनी पत्रकात नमूद केले आहे. या कामगारांना मोठ्या बॅगा, सॅनिटायजर, ग्लोव्हज आदी स्वयंरक्षणासाठी साहित्य देण्यात यावे, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. या स्विगी व झॉमेटो कंपनीच्या डिलीव्हरी कमगारांना तसेच पंचायत, पालिका, महापालिकेच काम करणार्‍या स्वच्छता कामगारांना देखील विमा योजना लागू करावी, असे नाईक यांनी पत्रकात सांगितले आहे.

वाचा : गोवा : कोकण रेल्वेचे आरक्षण सुरु, पण...