Tue, Mar 19, 2019 15:30होमपेज › Goa › गोवा: राष्ट्रपतींच्या उपस्थितीत पदवीदान सोहळा

गोवा: राष्ट्रपतींच्या उपस्थितीत पदवीदान सोहळा

Published On: Jul 07 2018 4:12PM | Last Updated: Jul 07 2018 4:12PMपणजी : प्रतिनिधी

गोवा येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत गोवा विद्यापीठाच्या ३० व्या पदवीदान सोहळा पार पडला. 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत आज गोव्यातील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर गोवा  विद्यापीठाच्या३० व्या पदवीदान सोहळा पार पडला. सोहळ्याच्या दरम्यान राष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांना मोलाचे  मार्गदर्शन केले.  शिक्षक, विद्यार्थी व पालकांच्या कठीण परिश्रम, त्याग व अखंड प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांना पदवी संपादन करणे शक्य झाले असाल्याचे त्यांनी सांगितले. गोवा व गोवा विद्यापीठाप्रती आपल्याला वैयक्तिक स्नेह असल्याचे कोविंद म्हणाले. 

गोवा विद्यापीठाच्या ३० व्या पदवीदान सोहळ्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सह त्यांच्या पत्नी सविता कोविंद यांनीदेखील हजेरी लावली होती. तसेच सोहळ्यात राज्यापाल मृदुला सिन्हा, मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासह अन्य मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.