Tue, Apr 23, 2019 09:47होमपेज › Goa › प्रतिमा कुतिन्होंची दोन तास चौकशी 

प्रतिमा कुतिन्होंची दोन तास चौकशी 

Published On: Jul 15 2018 1:28AM | Last Updated: Jul 15 2018 12:02AMपणजी : प्रतिनिधी

पीडित युवतीची ओळख   सार्वजनिक केल्याप्रकरणी आपल्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रारी या राजकीय हेतूने प्रेरीत असल्याचे प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो यांनी पणजी महिला पोलिस स्थानकात हजेरी  लावल्यानंतर पत्रकारांशी बोलताना  सांगितले.

कुतिन्हो म्हणाल्या, आपली सुमारे दोन तास चौकशी करण्यात आली. पोलिसांना सर्व ते सहकार्य  दिले असून जबानी नोंद केल्याचेही त्यांनी सांगितले. पीडित युवतीची ओळख   सार्वजनिक केल्याप्रकरणी समन्स बजावल्यानंतर  कुतिन्हो यांनी   शनिवारी  प्रदेश महिला काँग्रेसच्या सदस्यांसोबत   पणजी महिला पोलिस स्थानकात हजेरी लावली. कुतिन्हो म्हणाल्या, आपल्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या  तक्रारी खोट्या असून राजकीय हेतूने प्रेरीत आहेत. आपला सरकारविरोधी आवाज दडपण्यासाठीच हे सर्व केले जात आहे. काही झाले तरी  गोव्याच्या जनतेला न्याय देण्यासाठी आपण काम सुरुच  ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पीडित युवतीची ओळख   सार्वजनिक केल्याचा आरोप करून कुतिन्हो यांच्याविरोधात शिवसेना गोवा राज्य, सवेरा ट्रस्ट या स्वयंसेवी संघटनेच्या तारा केरकर यांनी पणजी महिला पोलिस स्थानक, तर गोवा राज्य महिला आयोगाने पोलिस महासंचालकांकडे तक्रार केली आहे.