होमपेज › Goa › राज्यात आज जोरदार सरींची शक्यता

राज्यात आज जोरदार सरींची शक्यता

Published On: Aug 27 2018 1:13AM | Last Updated: Aug 27 2018 12:28AMपणजी : प्रतिनिधी

राज्यात मान्सूनच्या सरी सध्या सामान्य प्रमाणात पडत आहेत. आतापर्यंत 88 इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्याच्या  काही भागात सोमवारी जोरदार पावसाची शक्यता गोवा वेधशाळेकडून व्यक्‍त करण्यात आली आहे. राज्यात गतवर्षीच्या तुलनेत सरासरीपेक्षा आतापर्यंत 15 टक्के कमी पावसाची नोंद झालेली आहे. राज्यात अधूनमधून तुरळक पावसाच्या सरी कोसळत आहेत. 

सांगे भागात 2 सें. मी. तर पेडणे, साखळी, काणकोण आणि केपे भागात 1 सें. मी. पावसाची रविवारी नोंद झाली आहे. राज्यातील कमाल तापमान 30.7 अंश सेल्सियस तर किमान 24.4  अंश सेल्सियस इतके आहे. हवामानात 87 टक्के आर्द्रता आहे. त्याचप्रमाणे समुद्र खवळलेल्या अवस्थेत असल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात सांगे भागात सर्वाधिक 106 इंच पावसाची नोंद झाली आहे तर मुरगाव भागात सर्वात कमी 72 इंच पाऊस झाला आहे.