Fri, Apr 26, 2019 03:22होमपेज › Goa › फार्मेलिनयुक्‍त मासळी प्रकरणी जनहित याचिका दाखल

फार्मेलिनयुक्‍त मासळी प्रकरणी जनहित याचिका दाखल

Published On: Jul 24 2018 1:33AM | Last Updated: Jul 24 2018 1:33AMपणजी : प्रतिनिधी

फार्मेलिनयुक्‍त मासळीसंबंधी न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका येथील रहिवासी शिवराज कामत  तारकर यांनी सोमवारी  मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दाखल केली. तारकर म्हणाले, मासळी हा गोमंतकीयांच्या जिव्हाळ्याचा विषय असून तो जेवणातील महत्त्वाचा घटक आहे. मात्र तरीदेखील फार्मेलिनयुक्‍त मासळीसंदर्भात जनतेला स्पष्ट अशी कुठलीच माहिती सरकारकडून दिली जात नसून जनतेची या विषयावर दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. 

फार्मेलिनयुक्‍त मासळीबाबत 12 जुलै रोजी राज्यात  ज्या घडमोडी घडल्या त्याची न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणी कामत यांनी याचिकेद्वारे केली आहे. त्याचबरोबर अन्‍न व औषध प्रशासन  विभाग अधिक सशक्‍त करणे आवश्यक आहे. विकल्या जाणार्‍या मासळीची  आवश्यक ती तपासणी व्हावी. अन्‍न व औषध प्रशासन सशक्‍त करेपर्यंत राज्यात मासळी आयातीवर बंदी कायम ठेवावी, अशीही मागणी याचिकेत केल्याचे तारकर यांनी सांगितले.