Sun, May 26, 2019 19:53होमपेज › Goa › संपूर्ण प्लास्टिकमुक्त गोवा ही प्रत्येकाची जबाबदारी : मुख्यमंत्री

संपूर्ण प्लास्टिकमुक्त गोवा ही प्रत्येकाची जबाबदारी : मुख्यमंत्री

Published On: Dec 20 2017 1:39AM | Last Updated: Dec 19 2017 11:49PM

बुकमार्क करा

पर्वरी : वार्ताहर

येत्या दि.26 जानेवारी पर्यत गोवा प्लास्टिक मुक्त होईल, याची जबाबदारी प्रत्येक नागरिकांने घेतली पाहिजे. सरकार प्लास्टिक बंदी कायदा लवकरच लागू करणार आहे. त्यात जो कोणी प्लास्टिकचा वापर करताना सापडेल त्याला पाच हजार रुपयांपर्यत दंड आकारण्याची तरतूद असेल,असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले.

रेईस मागुस येथे नव्याने नूतनीकरण केलेल्या पंचायत सभागृहाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री पर्रीकर बोलत होते. व्यासपीठावर गृहनिर्माण मंडळाचे मंत्री जयेश साळगावकर, गोवा साधन सुविधा मंडळाचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कुंकळकर, सरपंच शैलेश परुळेकर, उपसरपंच सिया नागवेकर,पंचायत सदस्य केदार नाईक, सुभाष पेडणेकर, सुश्मिता पेडणेकर, वीरेंद्र शिरोडकर उपस्थित होते.

मुख्यमंत्री पर्रीकर म्हणाले, की वेरे परिसरातील रस्त्यालगत असलेल्या लोकांनी योग्य सहकार्य केले तर येथील रस्ता तीनपदरी करण्यास सरकार तयार आहे. त्यातून या लोकांची वारंवार होणार्‍या वाहतूक कोंडीतून सुटका होईल. तसेच सरकार ज्या लोकांचे या योजनेमुळे नुकसान होईल त्यांना सर्व प्रकारची मदत करण्यास तयार आहे. दरडोई उत्पनाबाबत  गोवा हे देशातील पाहीले राज्य आहे. पण येथे रस्ता अपघात मोठ्या  प्रमाणात होत आहेत. रस्ता सुरक्षते बाबत जागृती करणे आवश्यक आहे. प्रत्येकाने स्वतःच्या सुरक्षेतेला प्राधान्य दिले पाहिजे. तसेच महिलांनी आवर्जून हेल्मेटचा वापर केला पाहिजे. 
ग्रामीण विकास संस्थेत मोठ्याप्रमाणात बदल करून नवीन योजना राबविण्याचा सरकारचा विचार आहे.  साळगाव मतदारसंघात एक स्वतंत्र पोलीस स्थानक लवकरच सुरु केले जाईल.  वेरे रस्ता रुंदिकरण हा मोठा प्रश्‍न असून तो लोकांच्या सहकार्याने   सोडविला जाईल,असे गृहनिर्माण मंडळ,बंदर व ग्रामीण विकास मंडळाचे मंत्री जयेश साळगावकर यांनी सांगितले.

गोवा साधन सुविधा विकास महामंडळा मार्फत एक कोटी रुपये खर्च करून रेईस मागुस पंचायत सभागृह बांधण्यास आले आहे. त्यात उपआरोग्य केंद्र, उपहारगृह, वाचनालय, पंचायत कार्यालय आणि वीज खात्याचे कार्यालय या सुविधा असणार आहेत.  मुख्यमंत्री  मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते   सभागृहचे उद्घाटन  करण्यात आले. श्रीराम  यांनी सूत्रसंचालन केले.  केदार नाईक यांनी आभार 
मानले.