होमपेज › Goa › नवोदित दिग्दर्शकांसाठी तंत्रज्ञान वरदान 

नवोदित दिग्दर्शकांसाठी तंत्रज्ञान वरदान 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पणजी:प्रतिनिधी

भारतात अनेक सामाजिक विषय आहेत जे यापूर्वी दिग्दर्शकांकडून  चित्रपटाच्या माध्यमातून हाताळण्यात आले नाहीत. आज तंत्रज्ञान वेगाने  प्रगत होत असून   नवोदित दिग्दर्शकांसाठी ते वरदान ठरत आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक विषय हाताळणे सोपे जात असल्याचे मत  दिग्दर्शक अतनू मुखर्जी यांनी व्यक्त केले. 

इफ्फीत इंडियन पॅनोरमात फिचर फिल्म च्या ‘दिग्दर्शकांशी संवाद’  पत्रकार परिषदेत ‘रूख’ या चित्रपटाचे दिग्दर्शक अतनू मुखर्जी बोलत होते. त्यांच्यासोबत चित्रपटाच्या सिनेमेटोग्राफर पूजा गुप्ते व किशन रत्नानी उपस्थित होते.

अतनू मुखर्जी म्हणाले, की समाजाने आजही मानसिक आजाराला गांभीर्याने घेतल्याचे दिसून येत नाही. ‘रूख’  या चित्रपटात एक मुलगा  मानसिक आजारातून बाहेर येण्यासाठी करति असलेले प्रयत्न दाखविण्यात आले आहेत. चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत  आहे. शेवटी चित्रपट कसा प्रभावी बनणार की बंद पडणार हे चित्रपटाच्या दिग्दर्शकाच्या हाती असते असे मुखर्जी यांनी सांगितले. 

पूजा गुप्ते म्हणाल्या, की एका सिनेमॅटोग्राफर ला प्रत्येक सीन महत्वाचा असतो. एखाद्या चित्रपटासाठी काम करीत असतातना दिलेल्या वेळेत सीन पूर्ण करणे म्हणजे आव्हान असते. एकदा का अचूक वेळ हातातून गेली तर त्यासाठी फार वेळ वाया जातो. 

एक काळ असा होता ज्यावेळी सिनेमॅटोग्राफर सारख्या क्षेत्रात महिला पोचल्या नव्हत्या. परंतु आता समाजाचा, महिला व व्यवसाय याकडे पाहण्याचा दृष्टीकोन जसा बदलत चालला त्यातूनच महिलांचे पाऊल वेगवेगळ्या क्षेत्राकडे वळत असल्याचे दिसून येते. शेवटी माणसाचा दृष्टीकोन बदलल्यास अनेक  गोष्टी सोप्या होतात,असे मत गुप्ते यांनी व्यक्त केले.