होमपेज › Goa › पर्रीकरांना अन्नातून विषबाधा; 'लिलावती'त दाखल

पर्रीकरांना अन्नातून विषबाधा; 'लिलावती'त दाखल

Published On: Feb 15 2018 6:48PM | Last Updated: Feb 15 2018 7:14PMगोवा : प्रतिनिधी

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आज तातडीने मुंबईतील लिलावती रुग्‍णालयात दाखल झाले. ६२ वर्षीय पर्रीकर यांना पोटदुखीचा त्रास आहे. त्यांना अन्‍नातून विषबाधा झाल्याचा वैद्यकीय अहवाल असल्याचे सूत्रांकडून समजले आहे. 

बुधवारी पर्रीकर यांना पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना बांबोळीतील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आज, गुरुवारी ते मुंबईतील लिलावती रुग्‍णालयात दाखल झाले आहेत.

मुख्यमंत्री पर्रीकर यांना अन्‍नातून  विषबाधा झाल्याचा वैद्यकीय आला आहे. ते आज सकाळी पुन्‍हा गोवा वैद्यकीय महाविद्यालयात गेले होते. सध्या त्यांची प्रकृती ठीक असून केवळ तपासणीसाठी म्‍हणून ते मुंबईला गेल्याचे त्यांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले.