Tue, Apr 23, 2019 06:24होमपेज › Goa › एकामागोमाग एक चित्रपट प्रदर्शित करणे अयोग्य

एकामागोमाग एक चित्रपट प्रदर्शित करणे अयोग्य

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

मराठीत धडाधड एकापाठोपाठ एक  चित्रपट प्रदर्शित करण्याची सवय आहे. हिंदी सिनेसृष्टी अर्थात बॉलिवूडमध्ये असे होत नाही. चित्रपट प्रदर्शित करताना एकमेकांशी चर्चा करून समजूतदारपणाने मराठी चित्रपट प्रदर्शित केले पाहिजे, असे मत अभिनेते तथा कच्चा लिंबूचे दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी व्यक्त केले.

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ओक यांनी सांगितले की, मराठी चित्रपट सृष्टीत एकामागोमाग एक चित्रपट प्रदर्शित केले जातात. असे प्रकार हिदी चित्रपट सृष्टीत घडत नाही. मराठीत धडाधड सिनेमा प्रदर्शित होत असल्याने एकही सिनेमा हीट होत नाही. मराठीत चित्रपट प्रदर्शित करण्याबाबत समजूतदारपणा वाढला पाहिजे.

सध्या ऑनलाईन  सिनेमाचा काळ आहे. मात्र ऑनलाईन सिनेमा ज्येष्ठ व्यक्ती पाहू शकत नाहीत. त्यांना सिनेमागृहात बसूनच सिनेमा पाहण्याची हौस असते, असे ते म्हणाले.
मराठी चित्रपट सृष्टीला सध्या चांगले दिवस आले आहेत. चांगले आशय आणि विषय असलेले चित्रपट मराठीत तसेच अन्य भाषेत तयार होत आहेत. विविध विषय घेऊन समोर येणार्‍या चित्रपटांना आधार देण्यासाठी निर्मातेही पुढे सरसावत आहेत, असे ओक म्हणाले. इफ्फीत 9 मराठी सिनेमे निवडले गेले आहेत. यापैकी एक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत लढत देत आहे. आपला सिनेमा इफ्फीत दाखविला जात आहे,ही आपल्यासाठी  आनंदाची बाब आहे, असे ओक म्हणाले.