होमपेज › Goa › लोकोत्सवात लोकनृत्यांची धमाल

लोकोत्सवात लोकनृत्यांची धमाल

Published On: Jan 14 2018 1:52AM | Last Updated: Jan 13 2018 10:43PM

बुकमार्क करा
पणजी :  प्रतिनिधी

 पणजीतील कला अकादमीच्या दर्या संगमावर  शुक्रवारपासून सुरू झालेल्या लोकोत्सवास विविध राज्यातील लोकनृत्यांची धमाल दिसत आहे.   गेल्या दोन दिवसांपासून विविध राज्यातील कलाकार सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊन नृत्य प्रकार सादर करीत आहेत. या कलाकारांकडून सादर होणार्‍या लोकनृत्याविष्कारांना रसिकांकडून उत्स्फू र्त दाद मिळत आहे. लोकोत्सवात  वैविध्यपूर्ण नृत्याविष्कार, विविध राज्यांतील कलाकुसरीच्या वस्तू, खाद्य पदार्थ आणि बरच काही लोकांना पाहण्यास मिळत आहे. राजस्थानी लोकसंगीतातील गाणी आणि नृत्य प्रकार पाहण्याजोगा आहे.  ते मांगणीयार, भवई, कठपुतली, बहुरूपिया, कालबेलिया आदी कार्यक्रम सादर करीत आहेत. ओडिसा, आसाम, मणिपूर  पश्‍चिम बंगाल, सिक्‍किम, गुजरात, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगढ, हरयाणा,   उत्तराखंड, गोवा आदी राज्यातील कलाकार या लोकोत्सवात कला सादर करीत आहेत.

काही कलाकार आपल्या कलेल्या माध्यमातून सामाजिक भावना जपणुकीचे संदेश देत आहेत.  तर काही राज्यातील कलाकार विविध वेशभूषेतून कला सादर करीत आहेत. या लोकोत्सवात हस्तकलाकारही सामील झाले आहे. आधुनिक युगातही हस्तकलेच्या बाराकाव्याचे निरीक्षण या महोत्सवात पाहण्यात मिळत आहे.   विविध राज्यातील खाद्यपदार्थांचाही आस्वाद येथे घेण्यास मिळत 
आहे. कला आणि संस्कृती खात्याच्या पुढाकारने होत असलेला लोकोत्सवाचा रविवार दि.21 जानेवारीपर्यंत रसिकांना याचा आंनद लुटता येणार आहे.