Thu, Feb 21, 2019 03:34होमपेज › Goa › हणजुण येथे ८ लाखांचे अमलीपदार्थ जप्त; एकास अटक

हणजुण येथे ८ लाखांचे अमलीपदार्थ जप्त; एकास अटक

Published On: Feb 16 2018 7:39PM | Last Updated: Feb 16 2018 7:39PMपणजी : प्रतिनिधी

गुन्हे अन्वेशण विभागाने हणजूण येथे गुरुवारी रात्री अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी मिनिनो फेलिक्स फर्नांडिस (वय ५४ हणजूण)  याला रंगेहाथ अटक केली. यावेळी त्याच्याकडुन ७.५० लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. 

मिनिनो फेलिक्स फर्नांडिस याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थामध्ये ६७ ग्रॅम वजनाचा एमडीएमइ व ९.९३ किलो कोकेनचा समावेश आहे. फर्नांडिस हा व्यावसायिक आहे, प्राप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री १२.३० वाजता ही कारवाई केली. फर्नांडिस विरोधात अंमला पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे. त्याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे.