Tue, Sep 25, 2018 08:39होमपेज › Goa › कवळेकरांच्या जामिनाला एसीबीकडून विरोध

कवळेकरांच्या जामिनाला एसीबीकडून विरोध

Published On: Mar 23 2018 1:57AM | Last Updated: Mar 23 2018 12:04AMपणजी : प्रतिनिधी

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी  विरोधी पक्षनेते चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर यांनी पणजी न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व जामिनाला  भ्रष्टाचारविरोधी पथकाने (एसीबी) गुरुवारी झालेल्या सुनावणीवेळी  विरोध केला.

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणाच्या चौकशीसाठी कवळेकर यांची कोठडी आवश्यक आहे. त्यांच्या  बँक खात्यातील पैशांचा स्रोत समजण्यासाठी त्यांची चौकशी आवश्यक असल्याचे यावेळी पोलिसांकडून न्यायालयात सांगण्यात आले. या अर्जावरील सुनावणी तहकूब करण्यात आली आहे. 

कवळेकर व त्यांच्या पत्नी सावित्री कवळेकर यांच्या विरोधात सुमारे 4.78 कोटी रुपयांच्या बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी भ्रष्टाचार विरोधी पथकाने ऑगस्ट 2017 मध्ये एफआयआर नोंद केला होता. सदर प्रकरणी कवळेकर यांची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात आली होती.  

कवळेकर यांनी  यापूर्वी  दक्षिण गोवा प्रधान जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज  दाखल केल होता. मात्र, त्यांचा हा अटकपूर्व जामीन अर्ज तांत्रिक कारणावरून न्यायालयाने  1 मार्च रोजी रद्द केला. त्यानंतर कवळेकर यांनी  पुन्हा 7 मार्च रोजी पणजी न्यायालयात नव्याने अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला.  या अर्जावर सध्या पणजी न्यायालयात सुनावणी सुरु आहे. 

Tags : Goa, Goa news,  Kawalekar, bail, ACB, opposition,