Tue, Sep 25, 2018 05:16होमपेज › Goa › पाठिंब्याबाबत फेरविचाराचा प्रसंग सरदेसाईंवर येणार नाही

पाठिंब्याबाबत फेरविचाराचा प्रसंग सरदेसाईंवर येणार नाही

Published On: May 26 2018 1:50AM | Last Updated: May 26 2018 12:05AMपणजी : प्रतिनिधी 

लोकसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा देण्याबाबत फेरविचार करण्याचा प्रसंग गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्यावर येणार नसल्याचे सांगून खाणप्रश्‍नी न्यायालयाच्या माध्यमातून तोडगा निघेल, असा विश्‍वास भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी व्यक्त केला.   

ते म्हणाले, खाणप्रश्‍नी गोवा सरकार न्यायालयात गेले असून  न्यायालयाकडून दिलासा मिळेल, अशी आशा आहे. न्यायालयाच्या माध्यमातून खाणींचा प्रश्‍न   सुटेल. खाण व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी वटहुकूम जारी करण्याचा प्रश्‍नच येत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा मंत्री विजय सरदेसाई यांनी सरकारने खाणप्रश्‍नी तोडगा काढला नाही तर आगामी लोकसभा निवडणूक भाजपला त्रासदायक ठरेल. तसेच लोकसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा देण्याचा फेरविचार करू, असा इशारा दिला होता. या पार्श्‍वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर यांनी वरील विधान केले.