Mon, Mar 25, 2019 09:23होमपेज › Goa › ‘मंत्रिमंडळाच्या बैठकीत खाणप्रश्‍नी चर्चा करणार’

‘मंत्रिमंडळाच्या बैठकीत खाणप्रश्‍नी चर्चा करणार’

Published On: Mar 12 2018 1:04AM | Last Updated: Mar 11 2018 11:56PMफोंडा : प्रतिनिधी

खाण प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न गोवा सरकार करीत असून येत्या चार पाच दिवसांत मंत्रिमंडळाची बैठक घेऊन या प्रश्‍नावर चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतर केंद्र सरकारकडे विषय घेऊन जाणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी ‘पुढारी’शी बोलताना दिली. 

खाणीचा प्रश्‍न सध्या गोव्यातील लोकांच्या गळ्याशी आला आहे. राज्यातील सुमारे दोन लाख कुटुंबे खाणीवर अवलंबून आहेत. ट्रक मालक, मशीन मालक, कामगार,  ट्रक चालक, दुकानदार व अन्य व्यवसायिकांना खाण बंदीची मोठी झळ बसणार आहे. खाणी बंद झाल्यास सुमारे साडेतीन हजार कोटी रुपयांचा आर्थिक फटका सरळ सरकारला बसणार आहे. खाणी सुरू ठेवण्याचा प्रयत्न सध्या सुरू असून येत्या चार ते पाच दिवसांत मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात येणार आहे. बैठकीत खाण प्रश्‍नावर चर्चा करून गोव्यातील शिष्टमंडळ दिल्लीत जाणार आहे. केंद्र सरकारकडे खाणी सुरू ठेवण्यासाठी चर्चा करूनच गोवा सरकार आवश्यक निर्णय घेणार असल्याचे बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.