Wed, Apr 24, 2019 07:59



होमपेज › Goa › मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा आज वाढदिवस

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा आज वाढदिवस

Published On: Dec 13 2017 1:54AM | Last Updated: Dec 13 2017 12:38AM

बुकमार्क करा





पणजी : प्रतिनिधी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा 62वा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करण्याचे गोवा प्रदेश भाजपने ठरविले आहे. वाढदिवसानिमित्त मळा व पाटो प्लाझाला जोडणार्‍या नव्या पुलाचे उद्घाटन वगळता अन्य कोणताही शासकीय कार्यक्रम ठेवण्यात आलेला नाही. 

बुधवारी सकाळी 8.30 वाजता पणजीचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मीचे दर्शन घेऊन पर्रीकर भाजप कार्यालयात येणार आहेत. भाजप कार्यकर्त्यांनी येथे सकाळी 9.30 वाजता रक्तदान कार्यक्रम आयोजित केला आहे. यानंतर 10 वाजता पर्रीकर हे दिशा चॅरिटेबल ट्रस्टच्या विद्यार्थ्यांबरोबर आणि पीपल्स शाळेच्या विशेष मुलांसोबत वाढदिवस साजरा करणार आहेत. 

हिवाळी अधिवेशनाचा बुधवारी  पहिला दिवस असल्याने पर्रीकर त्यानंतर पर्वरीला रवाना होणार आहेत. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचे कामकाज  संपल्यानंतर  मळा येथील नव्या पुलाचा लोकार्पण सोहळा पर्रीकर यांच्या हस्ते संध्याकाळी 5 वाजता होणार आहे. या कार्यक्रमानंतर जनतेला भेटण्यासाठी मळा येथील डॉ. हेडगेवार हायस्कूलच्या मैदानावर पर्रीकर उपस्थित राहणार आहेत,असे  आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी सांगितले.