Thu, Feb 21, 2019 15:10होमपेज › Goa › मुलीही बिअर पितात, काळजी वाटते : पर्रिकर

मुलीही बिअर पितात, काळजी वाटते : पर्रिकर

Published On: Feb 10 2018 1:00PM | Last Updated: Feb 10 2018 1:00PMपणजी : पुढारी ऑनलाईन

मुलींमध्ये अल्कोहोल घेण्याचे प्रमाण वाढल्याने माझी काळजी वाढल्याचे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सांगितले . गोवा विधीमंडळ विभागाकडून राज्य युवा संसद कार्यक्रमात ते बोलत होते. 

आता मुलींनी बिअर पिण्यास सुरुवात केली आहे. या गोष्टीची मला प्रचंड काळजी वाटत आहे. मुली सहनशीलतेची मर्यादा ओलांडत असल्याचे पर्रिकर म्हणाले. अर्थात मी सरसकट सर्वांबद्दल बोलत नाही. तसेच या सभागृहात असलेल्या लोकांबद्दल देखील बोलत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

गोव्यातील अंमली पदार्थांच्या व्यापाराबद्दलही त्यांनी भाष्य केले. राज्य सरकारने अंमली पदार्थांचा व्यवसाय करणारे नेटवर्क मोडून काढल्याचा दावा पर्रिकर यांनी केला. राज्यात अंमली पदार्थांची विक्री होत असली; तरी कॉलेजमध्ये याचा पुरवठा केला जातो, असे मला वाटत नाही. 

अंमली पदार्थांच्या व्यवसायावर कडक कारवाई करणयाचे आदेशही पोलिसांना दिले आहेत. अंमली पदार्थांची विक्री करताना १७० जणांना ताब्यात घेण्यात आले असल्याचेही ते म्हणाले. 

नियमानुसार, एखादा लहान प्रमाणात अंमली पदार्थांची विक्री करताना आढळला तर त्याला ८ ते १५ दिवसात किंवा महिन्याभरात जामिन मंजूर होतो. राज्यातील न्यायव्यवस्था क्षमाशील झाली आहे. पण माझ्या मते दोषी व्यक्तीला पकडणे आवश्यक आहे. 

बेरोजगारीबद्दल बोलताना पर्रिकर म्हणाले की, राज्यातील तरूण कष्टाची कामे करायला लाजतात. यामुळेच क्लर्क पदाच्या जागांच्या मोठी रांग लागते. कारण त्यांनी कष्टाची कामे करायची नाहीत. लोकांनी असा समज करून घेतला आहे की, सरकारी काम म्हणजे निवांत आणि काहीच काम नाही, असे ही ते म्हणाले.