Tue, Jul 16, 2019 13:47होमपेज › Goa › मडगाव घाऊक मासळी बाजार पूर्ववत

मडगाव घाऊक मासळी बाजार पूर्ववत

Published On: Jul 14 2018 12:55AM | Last Updated: Jul 14 2018 12:55AMमडगाव : प्रतिनिधी

 अन्न आणि औषध प्रशासनाने गुरुवारी मडगावच्या घाऊक मासळी बाजारात टाकलेल्या छाप्यानंतर बंद झालेला माडेल येथील घाऊक मासळी बाजार  शुक्रवारी पहाटे 4 वाजता पूर्ववत सुरू  होऊन एफडीएच्या कारवाईत अडकून पडलेल्या 17 ट्रकांसह नव्याने दाखल झालेल्या 5 ट्रक मासळीचा लिलाव  झाला. 

कुडचडे, सावर्डे,सांगे केपे,म्हापसा आदी भागातील मासळी बाजार गुरूवारी बंद ठेवण्यात आला होता.  मडगावचा घाऊक मासळी बाजार पूर्ववत सुरू झाल्याने  वरील भागातील मासळी बाजारात मासळी पोचली होती.

एफडीएच्या छाप्यानंतर वितरकांनी मासळी बाजार बंद ठेवल्याने  पराज्यातून आलेली सतरा ट्रक मासळी   राज्यात वितरित होऊ शकली नव्हती, पण नंतर अन्न आणि औषध प्रशासनाने घुमजाव करत मासळीच्या नमुन्यांमध्ये कोणतेही घातक रसायन आढळले नसल्याचे स्पष्ट केल्याने गेले चोवीस तास माडेल येथील घाऊक मासळी बाजारात अडकून पडलेल्या सतरा ट्रक मासळीसह आंध्रप्रदेश आणि केरळहून आलेली आणखी पाच ट्रक मासळी हातोहात खपली,असे घाऊक मासळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मौलाना इब्राहिम यांनी सांगितले.