Tue, Jan 22, 2019 20:03होमपेज › Goa › धावत्या कारवर माड पडून महिला ठार

धावत्या कारवर माड पडून महिला ठार

Published On: Jun 12 2018 12:52AM | Last Updated: Jun 12 2018 12:32AMदाबोळी : प्रतिनिधी

झोरींत सांकवाळ येथे सांत जासिंतो वाहतूक बेटाजवळ धावत्या अल्टो कारवर माड पडून सोमवारी झालेल्या दुर्घटनेत शांताबाई नाईक सावर्डेकर (वय 75) ही महिला ठार झाली. या घटनेत कारचेही मोठे नुकसान झाले.

वेर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी संध्याकाळी झोरींत सांकवाळ येथील सांत जासिंतो बेटाजवळ राष्ट्रीय महामार्गावर चालत्या आल्टो कार (जीए-06-डी-9022) वर अचानक माड कोसळून झालेल्या दुर्घटनेत कारमधील शांताबाई नाईक ही महिला गंभीर जखमी झाली. यावेळी शांताबाई आपला जावई व मुलीसह वास्कोहून शिरगावकडे जात होत्या, त्या गाडीत मागच्या सीटवर बसल्या होत्या. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने चिखली येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले असता येथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शांताबाई नाईक या मूळ सावर्डे येथील असून वास्को येथे आपल्या मुलीकडे आल्या होत्या. संध्याकाळी जावई व मुलीसमवेत शिरगावकडे जात असताना ही दुर्घटना घडली.