Mon, Aug 19, 2019 11:07होमपेज › Goa › लोकोत्सवात कुल्फी,रसमलाईवर खवय्यांचा ताव!

लोकोत्सवात कुल्फी,रसमलाईवर खवय्यांचा ताव!

Published On: Jan 19 2018 1:50AM | Last Updated: Jan 18 2018 11:11PMपणजी : अभिजीत रांजणे

गेल्या 17 वर्षांपासून आपण लोकोत्सवात येत आहे. गोमंतकीय लोक दुधापासून तयार केलेल्या पदार्थांना पसंत करतात. गेले सहा दिवस गुलाबजाम, कुल्फ ी, रसमलाईसह इतर पदार्थांवर खवय्ये ताव मारत आहेत, अशी माहिती उत्तर प्रदेश लखनऊ येथील शिवशंकर अग्रवाल यांनी दिली.

शिवशंकर अग्रवाल म्हणाले, की दुधापासून तयार करणार्‍या पदार्थांचा व्यवसाय हा आमची तिसरी पिढी सांभाळत आहे. या व्यवसायात घरातील महिलांही हातभार लावत असतात. गोव्यातील कला आणि संस्कृति संचालनालयाच्या  लोकोत्सवाप्रमाणे आम्ही इतरही  महोत्सवात स्टॉल मांडत असतो. साधारण आम्ही 50 ते 60 प्रकारांचे पदार्थ तयार करीत असतो. ज्या- ज्या राज्यात जाईल, त्या-त्या राज्यातील पदार्थांची माहिती करून घेत असतो. बंगाली खाद्य पदार्थ, गुजरात, राजस्थानमधील दुधापासून तयार केलेले पदार्थ आम्ही बनवतो. या चांगल्या प्रतीच्या दुधापासून पदार्थ बनवल्यामुळे ग्राहकांची नेहमीच आमच्या स्टॉलवर गर्दी असते. 

देशभरातील विविध महोत्सवात आम्हाला पुरस्कार  मिळाले आहेत.  उदयपूर पश्‍चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे सुवर्ण पदक प्राप्त झाले आहे. देशात इतर राज्यांतील महोत्सवात सहभागी होण्याबरोबर दुबई आणि सिंगापूर येथील महोत्सवात सहभागी होण्याचा आमचा मानस आहे. या महोत्सवात अनुप, विकास ही दोन मुले सहकार्य करीत आहेत, असेही अग्रवाल म्हणाले.