Mon, Jul 15, 2019 23:38होमपेज › Goa › काकोड्यातील जिओ टॉवरला टाळे

काकोड्यातील जिओ टॉवरला टाळे

Published On: Feb 24 2018 1:15AM | Last Updated: Feb 23 2018 11:57PMकाकोडा : वार्ताहर 

माधेगाळ काकोडा येथे उभारण्यात येत असलेला जिओ कंपनीचा निर्धारित टॉवर बेकायदेशीर असल्याने कुडचडे-काकोडा पालिकेने टॉवर भोवती कुंपण उभारुन त्याला टाळे ठोकले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार माधेगळ काकोडा येथे सदर कंपनीच्या टॉवर उभारणीचे काम युद्धपातळीवर सुुरू होते. टॉवर उभारणीचे काम पूर्णपणे बेकायदेशीर असून नागरिकांना याचा त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढल्याने पालिकेचे मुख्याधिकारी प्रमोद देसाई यांनी टॉवरला टाळे ठोकले. तसेच या टॉवरच्या भोवती कुंपण उभारुन पोलिसांना यावर नजर ठेवण्यास सांगितले आहे. वीज खात्यालाही संबंधित टॉवरची वीज जोडणी तोडण्याचे आदेश पालिका मुख्याधिकार्‍यांनी दिले आहेत. त्याचबरोबर सदर टॉवरच्या कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस जारी करुन आठ दिवसांच्या आत याबाबत स्पष्टीकरण देण्यास सांगितले होते. परंतु, कित्येक दिवस उलटूनही सदर कंत्राटदाराने अद्याप उत्तर न दिल्याने त्याला पुन्हा नोटीस जारी करण्यात आली होती. संबंधित कंत्राटदार जोपर्यंत नाहरकत दाखला घेत नाही तोपर्यंत त्याला टॉवर उभारणीचे काम करू देणार नसल्याचे पालिकेने म्हटले आहे.  त्या कंत्राटदारावर पालिका कायद्यानुसार 184 कलमांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.