Thu, May 23, 2019 04:18होमपेज › Goa › सर्व आमदारांचे सहकार्य हवे : कवळेकर

सर्व आमदारांचे सहकार्य हवे : कवळेकर

Published On: Jul 27 2018 1:24AM | Last Updated: Jul 27 2018 1:24AMपणजी : प्रतिनिधी    

राज्यात बंद पडलेल्या खाणी पुन्हा सुरू होण्यासाठी सर्व तो प्रयत्न सरकारने करावा, यासाठी विधानसभेतील सर्व आमदारांची एकत्रितरित्या कार्य करण्याची तयारी आहे, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर  यांनी विधानसभेत केले.

खाण विषयावरील अनुदानित मागण्यांवरील चर्चेत कवळेकर बोलत होते. कवळेकर म्हणाले की, कायदेशीररित्या खाणी लवकरात लवकर सुरू करण्यासाठी सर्व आमदारांनी एकमेकांची उणीदूणी न काढता सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. सहा महिन्यांच्याआधी सर्वोच्च न्यायालयाने खाणबंदीचा आदेश लागू केला असला तरी त्यावर अजूनही तोडगा काढण्यास सरकारला अपयश आले आहे. अनेक कुटुंबांचे संसार रस्त्यावर आले असून त्यांच्या लहान- मोठ्या माणसांच्या तोंडांवरील हास्य नाहिसे झाले आहे. ट्रक मालकांना देण्यात आलेले अनुदान बंद झाले असून ते पुन्हा सुरू करावे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून तोडगा काढण्याचा प्रयत्न करावा.

‘घोटाळ्याचा नेमका आकडा किती ?’

काँग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी खाण घोटाळा नेमका किती कोटींचा आहे, ते स्पष्ट करण्याची मागणी केली. राज्य सरकारकडून दरवेळेला खाण घोटाळ्याबाबत नवी आकडेवारी दिली जात असल्याची टीकाही त्यांनी केली. शहा आयोगाने आणि न्यायालयात बेकायदेशीर खाणी चालवल्याचा आरोप झालेल्या कंपन्यांना पुन्हा नव्या खाणी चालवण्यासाठी  देऊ नयेत. राज्यात स्वतंत्ररित्या खाण व्यवसाय सुरू रहावा असा प्रयत्न सरकारने करावा, असा विचारही त्यांनी मांडला