होमपेज › Goa › कर्नाटककडून कणकुंबीत पुन्हा कळसा-भंडुराचे काम सुरु

कर्नाटककडून कणकुंबीत पुन्हा कळसा-भंडुराचे काम सुरु

Published On: Dec 03 2017 12:44AM | Last Updated: Dec 03 2017 12:31AM

बुकमार्क करा

डिचोली : प्रतिनिधी

म्हादईप्रश्‍नी महत्त्वपूर्ण सुनावणी लवादासमोर महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन ठेपलेली असताना कणकुंबी येथे कर्नाटकने पुन्हा कळसा भंडुरा कालव्याच्या कामाला सुरुवात केली.  सुनावणीवेळी सपशेल अपयशी ठरलेल्या कर्नाटकने कालव्याचे काम पुन्हा चालू ठेवून गोव्याला अडचणीत आणण्याचे प्रयत्न चालवले आहेत.

लवादासमोर गोव्याच्या साक्षिदाराच्या उलट तपासणीत मुद्देसुद उत्तरे देताना कर्नाटकला उघडे पाडण्यात आले असून आता गोव्याच्यावतीने कर्नाटक व महाराष्ट्राच्या साक्षिदारांची उलट तपासणी सुरू आहे. याच दरम्यान, कर्नाटकने सर्व नियमांचे उल्लंघन करत पुन्हा कामाला सुरुवात  केली आहे. कर्नाटकने कालव्याचे काम 100 टक्के पूर्ण करण्याचा घाट घातला आहे.

पर्यावरण कार्यकर्ते राजेंद्र केरकर यांनी शनिवारी कणकुंबी येथे भेट दिली असता कालव्याच्या परिसरात कर्नाटककडून मोठ्या प्रमाणात काम सुरू असल्याचे आढळले. कर्नाटकने सर्व नियम धाब्यावर बसवत पुन्हा काम सुरू केल्याने गोव्याला पुन्हा सतर्क रहावे लागणार आहे, असे केरकर यांनी स्पष्ट केले.