Mon, May 27, 2019 00:45होमपेज › Goa › दागिने घेऊन पसार झालेल्या कामगाराला म्हापश्यात अटक 

दागिने घेऊन पसार झालेल्या कामगाराला म्हापश्यात अटक 

Published On: Mar 08 2018 1:50AM | Last Updated: Mar 07 2018 11:54PMम्हापसा  : प्रतिनिधी

घरमालकिणीला मारहाण करून दागिने घेऊन पसार झालेल्या विक्रम माणिक (20)या मुळच्या छत्तीसगड येथील युवकाला म्हापसा पोलिसांनी अटक केली. दरम्यान,जखमी वृध्द घरमालकिणीला गोमेकॉत उपचारासाठी दाखल केले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घरमालकिणीला मारहाण करून तिच्या हातातील सोन्याच्या बांगड्या , सोनसाखळी तसेच मुलीच्या हातातील सोनसाखळी असा दीड लाख रुपयांचा ऐवज घेऊन घरगडी म्हणून आलेल्या तरूणाने दुसर्‍या दिवशी पहाटे पळ काढल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला.  सिरसाटवाडा (अन्साभाट) येथील कुसुम सिरसाट (86)यांनी विक्रम या युवकाला घरकामासाठी बोलावले. संध्याकाळी उशिरापर्यंत काम केल्यानंतर इथेच झोपतो, असे घरमालकिणीला त्याने सांगितले. नंतर पहाटे 4.30  वाजण्याच्या सुमारास तो कुसुमच्या खोलीत गेला व त्याने तिच्या गळ्यातील सोनसाखळी व अन्य दागिन मारहाण करून हिसकावून घेतले.दरम्यान श्रध्दा या कुसुमच्या मुलीने आरडा ओरड केल्याने शेजारी जमा झाले.त्यांनी जखमी कुसुमला दवाखान्यात दाखल केले.