Fri, Jul 19, 2019 19:57होमपेज › Goa › वाहन निरीक्षक फडते लाचप्रकरणी निलंबित

वाहन निरीक्षक फडते लाचप्रकरणी निलंबित

Published On: Aug 14 2018 1:04AM | Last Updated: Aug 14 2018 1:04AMपणजी : प्रतिनिधी

पोळे तपास नाक्यावर कथित लाच घेताना ऑन कॅमेरात आढळून  आलेल्या वाहतूक खात्याचा मोटार वाहन निरीक्षक  नारायण फडते यांना सेवेतून निलंबित केल्याची माहिती  वाहतूक संचालक निखिल देसाई यांनी दिली. कथित लाचप्रकरणी फडते यांची  खात्याकडून  चौकशी केली जात आहे. चौकशी प्रलंबित असल्याने त्यांना निलंबित करण्यात आल्याचेही देसाई यांनी सांगितले. 

या संदर्भातील फाईल सरकारला वर्ग करण्यात आली आहे. या फाईलमध्ये गोपनीय अहवालाचादेखील समावेश करण्यात आला आहे.  या अहवालाच्या आधारे संबंधित मोटार वाहन निरीक्षक फडते यांच्यावर आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे वाहतूक संचालक  देसाई यांनी  सांगितले.    

पोळे तपासणी नाक्यावर ड्युटीवर असताना मोटर वाहक निरीक्षक फडते यांना एका खासगी वृत्तवाहिनीने केलेल्या स्टींग ऑपरेशनमध्ये   त्या मार्गावरुन  जाणार्‍या  वाहनांकडून   लाच घेताना  ऑन कॅमेरा दाखवण्यात आले होते. या घटनेची गंभीर दखल   वाहतूक खात्याकडून घेण्यात आली. त्यानुसार  फडते यांच्या निलंबनाचा आदेश सोमवारी (दि.13) जारी करण्यात  आला.