Sun, Mar 24, 2019 10:29होमपेज › Goa › आयात मासळीची नियमित चाचणी करणार : आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे  

आयात मासळीची नियमित चाचणी करणार : आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे  

Published On: Jul 14 2018 12:55AM | Last Updated: Jul 14 2018 12:55AM पणजी :प्रतिनिधी

माशांमध्ये किरकोळ प्रमाणात ‘फॉर्मोलिन ’ असतेच,हे प्रमाण मर्यादेच्या आत असल्यास त्याच्या सेवनामुळे मानवी आरोग्याला हानी पोहचत नाही. राज्यात आयात होणार्‍या मासळीची नियमित तपासणी केली जाणार असून  मर्यादेबाहेर ‘फॉर्मोलिन’ असलेल्या माशांची विक्री राज्यात रोखणार असून गोमंतकीयांच्या जीवाशी कोणालाही खेळू देणार नाही,असा इशारा आरोग्य मंत्री विश्‍वजित राणें यांनी  दिला.

अन्न आणि औषध प्रशासनाने गुरूवारी  मडगाव येथील घाऊक मासळी बाजारातील 17 ट्रक मासळीमध्ये ‘फॉर्मोलिन’ हे घातक रसायन असल्याच्या संशयावरून त्याची विक्री रोखली होती. या प्रकारावरून संतप्त झालेल्या मासळी विक्रेत्यांनी मडगाव, पणजी ,म्हापसा आणि अन्य बाजार बंद ठेवले होते. प्रशासनाने   मासळीचे घेतलेले नमुने आरोग्याला घातक नसल्याचे संध्याकाळी जाहीर केल्यावर मासळी विक्री पूर्ववत सुरू झाली.

या विषयी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना आरोग्यमंत्री राणे म्हणाले, की राज्यात अन्य शेजारी राज्यातून मासळीची आयात केली जाते. या मासळीची आता नियमीत तपासणी केली जाणार आहे. मासळीमध्ये ‘फॉर्मोलिन’ हे घातक रसायन मर्यादेच्या आत असल्यास त्याची विक्री करण्यास परवानगी दिली जाणार आहे.