Sun, Jul 21, 2019 12:04होमपेज › Goa › चार प्रियकरांसोबत मिळून 'तिने' पतीचे केले तीन तुकडे!

चार प्रियकरांसोबत मिळून 'तिने' पतीचे केले तीन तुकडे!

Published On: May 09 2018 1:56AM | Last Updated: May 10 2018 2:11PMमडगाव : प्रतिनिधी

कुडचडेतील एका महिलेने आपला पती बसुराज उर्फ बसू बाकडी (वय 38) याचा खून केल्यानंतर मृतदेहाचे तीन तुकडे करून ते अनमोड घाटात फेकल्याचे मंगळवारी उघडकीस आले.   बेपकेगाळ कुडचडेतील  एका फ्लॅटमध्ये ही खळबळजनक घटना 2 एप्रिल रोजी घडली  असून   पोलिसांना सदर फ्लॅटमध्ये रक्‍ताचे डाग आढळून आहेत. पोलिसांनी याप्रकरणात संशयित कल्पना बाकडी हिच्यासोबत अब्दुल शेख, सुरेश कुमार, पंकज पवार या चौघांना ताब्यात घेतले असून मुख्य संशयित फरारी आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुडचडे येथील अनू अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये राहणार्‍या संशयित कल्पना बाकडी या महिलेने आपल्या साथीदारांच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केली. या प्रकरणातील मुख्य संशयित गोव्याबाहेर पळून गेला आहे. या चौघांपैकी एक जण सरकारी कर्मचारी असून   तो दक्षिण गोव्यातील एका मामलतदाराचा वाहन चालक आहे.

वाचा बसुराजच्या मृतदेहाचे तुकडे अनमोड घाटातून हस्तगत

सदर महिलेने मृतदेहाचे तुकडे करून तेे अनमोड घाटातील खोल दरीत फेकून दिल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. सदर मृतदेहाचे तुकडे  आज, बुधवारी (दि.8) दरीतून वर काढले जाणार आहेत. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत हे प्रकरण नोंद करण्याचे काम सुरू होते. रात्री उशिरा पोलिस उपअधीक्षक उत्तम राऊत देसाई यांनी  कुडचडेचे पोलिस निरीक्षक रवींद्र देसाई आणि या घटनेच्या खबर्‍यासमवेत  सदर घटना घडलेल्या इमारतीतील फ्लॅटची पाहणी केली. फ्लॅटमध्ये रक्ताचे डाग आढळून आले आहेत. पुरावे नष्ट करण्यासाठी संशयितांनी रक्ताचे डाग पुसल्याचेे दिसून आले. बेडरूममधील ज्या खाटेवर हा खून करण्यात आला, त्या खाटेवरील गादी संशयितांनी पाण्यात फेकून दिली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार पतीच्या जाचाला कंटाळून कल्पना बाकडी या महिलेने  पतीला संपविण्याचा निर्णय घेतला होता. सदर महिला  परप्रांतीय असून गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या कुटुंबासोबत ती सावर्डे आणि कुडचडे परिसरात वास्तव्याला आहे. मृतदेहाचे डोके, आणि धड वेगळे करण्यात आल्याचे समजते. हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेली कोयता आदी हत्यारे पोलिसांना सापडली आहेत.

या घटनेची माहिती मिळताच दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक अरविंद गावस तसेच केपेचे पोलिस उपअधीक्षक उत्तम राऊत देसाई यांनी कुडचडे पोलिस स्थानकात येऊन चौकशी केली.