Wed, Jan 16, 2019 17:34होमपेज › Goa › सुपाची पुड पुलाच्या नामफलकाची नासधूस

सुपाची पुड पुलाच्या नामफलकाची नासधूस

Published On: Jan 04 2018 1:01AM | Last Updated: Jan 03 2018 8:29PM

बुकमार्क करा
वाळपई : प्रतिनिधी

साखळी मतदारसंघात होंडा-साखळी दरम्यान बांधण्यात आलेल्या सुपाची पुड येथील समांतर पुलाच्या  नामफलकाची अज्ञात समाजकंटकांनी  नासधूस केली. ही बाब  उघडकीस येताच  साखळी परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.  सदर पुलाच्या उद्घाटनानंतर म्हणजे 31 डिसेंबर 2017 रोजीच रात्री हे कृत्य करण्यात आले आहे. 

दरम्यान, सदर घटनेचा सभापती डॉ. सावंत यांनी कडक शब्दात निषेध केला आहे. ते म्हणाले, सदर पुलाची योजना सवार्ंच्या भल्यासाठी असून त्यामुळे कोणालाही पोटदुखी होण्याची गरज नाही. नामफलकाची नासधूस करण्यासारखे हीन कृत्य केले म्हणून साखळी मतदार सघांतील विकासाची प्रक्रिया थांबणार नाही. समाजकंटकांपासून नागरिकांनी सावध राहून या कृत्यामागील  लोकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

याबाबतची माहिती अशी, की वाळपई-साखळी दरम्यान दिवसेंदिवस वाढत्या रहदारीमुळे सुपाची पुड येथे असलेला जुना पूल कमी पडत होता. तसेच सदर पूल अरुंद असल्याने वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत होता. त्यामुळे या ठिकाणी  नवीन रूंद  किवा समांतर पुलाची उभारणी करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली होती. या मागणीची  दखल घेऊन  डॉ. प्रमोद सावंत यांनी  समांतर पुलाचे काम मार्गी लावले. सदर पुलाचे बांधकाम नुकतेच होऊन उद्घाटन सोहळा सभापती व इतर मान्यवरांच्या हस्ते 31 डिसेंबर रोजी सकाळी  पार पडला. मात्र, याच रात्री  याठिकाणी लावण्यात आलेल्या नामफलकाची काही समाजकंटकांनी नासधूस केली आहे. यामुळे सदर प्रकार साखळी भागात चर्चेचा विषय बनला आहे.