Tue, May 21, 2019 04:17होमपेज › Goa › बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी कवळेकरांची २० रोजी सुनावणी

बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी कवळेकरांची २० रोजी सुनावणी

Published On: Aug 14 2018 1:04AM | Last Updated: Aug 14 2018 1:04AMपणजी : प्रतिनिधी

विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्या विरोधातील बेहिशेबी मालमत्ता प्रकरणाचा तपास  अहवाल  सादर करण्यासंदर्भात पणजी विशेष न्यायालयाची भ्रष्टाचार विरोधी पथकाने परवानगी घेतली आहे. याप्रकरणी  पुढील सुनावणी आता  20 ऑगस्ट रोजी होईल. न्यायालयाने यावेळी  कवळेकर विरोधातील तपास  अहवाल   सादर  करण्यास आणखीन वेळ दिला जाणार नसल्याचे स्पष्ट करुन   यावरील युक्‍तीवाद येत्या आठवड्याभरात पूर्ण करा, असे सांगितले.

कवळेकर  यांच्याविरोधात  बेहिशेबी मालमत्ता प्रकरणाचा तपास  भ्रष्टाचार विरोधी पथकाकडून केला जात आहे.  उत्पन्‍नाचे स्रोत न दाखवता केरळ येथे  मालमत्ता खरेदी केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात  आला आहे. त्यांच्यावर मागील वर्षी  गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यानुसार  कवळेकर यांनी न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीनाला पोलिसांकडून  विरोध करण्यात आला आहे. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी   त्यांची चौकशी  होणे आवश्यक असल्याने   त्यांना कोठडी द्यावी, अशी मागणी  भ्रष्टाचार विरोधी पथकाने न्यायालयात  युक्‍तीवादावेळी केली आहे.