होमपेज › Goa › युवकांनी कृषी क्षेत्राचा विकास साधावा

युवकांनी कृषी क्षेत्राचा विकास साधावा

Published On: Jan 07 2018 2:01AM | Last Updated: Jan 07 2018 1:35AM

बुकमार्क करा
हळदोणे  : वार्ताहर

युवकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी क्षेत्राचा विकास साधण्याची आवश्यकता आहे. कृषी क्षेत्रात युवकांना व्यवसायाच्या अनेक   संधी आहेत. युवकांनी सरकारी नोकर्‍यांच्या मागे न लागता कृषी क्षेत्राचा विकास करावा, असे आवाहन     आमदार ग्लेन टिकलो यांनी  केले. करोणा  हळदोणे येथे सुमारे 33 लाख रूपये खर्च करून  बांधण्यात येणार्‍या संरक्षक भिंतीच्या बांधकामाचा प्रारंभ करताना  आमदार टिकलो बोलत होते. जलस्त्रोत खात्याचे अभियंता प्रदीप गाड, हळदोणे प्रभारी सरपंच प्रियंका पिंटो, पंचायत सदस्य तेजा वायंगणकर, शेतकरी संतोष वायंगणकर, जॉनितो सिक्वेरा, निकोलस फनार्ंडिस, आशू डायस, नेल्सन आझावेदो, माथायस फनार्ंडिस  उपस्थित होते.

आमदार टिकलो म्हणाले, की सुमारे 250 मीटर लांब व 3 मीटर उंच व मानशीच्या दरवाज्याचे  33 लाख रुपये खर्च करून लवकींच काम पूर्ण करण्यात येणार आहे.  मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व जलस्त्रोत मंत्र्याचे   मार्गदर्शन लाभत असल्यामुळे हळदोणे मतदारसंघातील समस्या सोडवणे शक्य होत आहे. शेती लागवड करण्यासाठी  सरकारतर्फे अनेक योजना राबवण्यात येत आहेत. यांत्रिकी शेतीसाठी 90 ते 95 टक्के अनुदान देण्यात येत आहे. शेतकर्‍यांनी सरकारी योजनांचा लाभ घेऊन हळदोणे मतदारसंघात हरीत क्रांती घडवण्याची आवश्यकता आहे. हळदोणे मतदारसंघ कृषी प्रधान असल्यामुळे जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी शेती व्यवसाय करावा, असे आवाहन आमदार ग्लेन टिकलो यांनी केले.

शेतात खारे पाणी शिरत असल्याने शेतकर्‍यांना शेती करणे शक्य होत नाही. त्यामुळे शेत जमीन पडीक ठेवण्यात येत आहे. संरक्षक भिंत बांधण्याची गेल्या अनेक वर्षाची शेतकर्‍यांची मागणी आमदार ग्लेन टिकलो यांच्या प्रयत्नामुळे पूर्ण करण्यात येत आहे. यामुळे आता पडीक शेत जमीन  लागवडीखाली येणार आहे. सुमारे 25 शेतकर्‍यांना या संरक्षक भिंतीचा लाभ मिळणार आहे, असे तेजा वायंगणकर यांनी सांगितले. प्रियंका पिंटो यांनी स्वागत केले. तसेच नववर्षाच्या शुभेच्छा देऊन हळदोणे मतदारसंघातील शेतकर्‍यांच्या समस्या सोडवण्यास सरकार प्राधान्याने प्रयत्न करीत असल्याचे सांगितले.