Mon, May 20, 2019 07:59होमपेज › Goa › ‘बिग बॉस सिझन 12’ चा नेरूल येथे शानदार प्रारंभ

‘बिग बॉस सिझन 12’ चा नेरूल येथे शानदार प्रारंभ

Published On: Sep 05 2018 2:13AM | Last Updated: Sep 04 2018 11:53PMपणजी : प्रतिनिधी

कलर्स वाहिनीवरील सर्वांचा आवडता  रियालिटी  शो  ‘बिग बॉस सिझन 12’ ची  मंगळवारी गोव्यातील नेरूल येथे सुरुवात झाली. या अधिकृत लाँचवेळी प्रसिद्ध अभिनेते व सलग 9 वर्षे  बिग बॉस कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केलेले सलमान खान उपस्थित होते. या कार्यक्रमात सलमान खान यांनी बिग बॉसचा यंदाचा विषय ‘विचित्र जोडी’ असल्याचे जाहीर केले. 

अभिनेते सलमान खान म्हणाले, संपूर्ण देश जितक्या उत्साहात  बिग बॉसची वाट पाहतो,तितक्याच उत्साहात आपणही वाट पाहतो. गेली 9 वर्षे बिग बॉसचे यजमानपद भूषवत असलो तरीही प्रत्येक नवा  सिझन आपल्यासाठी नवा अनुभव देणारा असतो. यंदाचा विषय ‘विचित्र जोडी’ हा फार मनोरंजक ठरणार असून बिग बॉससाठी नेमलेले स्पर्धक बिग बॉस प्रेमींनाही आवडतील, अशी खात्री आहे. स्पर्धक म्हणून  बिग बॉसच्या घरात राहणार्‍या जोड्या कठीण प्रसंगी एकमेकांना सावरतात की वेगळे होतात हे पाहणे फार मजेशीर असेल, असेही त्यांनी सांगितले.

नेरूळ येथील लाँचवेळी सलमान खान यांच्यासोबत पार्ले अ‍ॅग्रोच्या संयुक्त व्यवस्थापकीय संचालक नादिया चौहान, कलर्सच्या प्रोग्राम प्रमुख मनिषा शर्मा, वायकॉम 18 चे मुख्य ऑपरेटिंग अधिकारी राज नायक व अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. विनोदी अभिनेत्री भारती सिंग व त्यांचे पती हर्ष लिंबाचिया हेदेखील यावेळी उपस्थित होते. 

राज नायक म्हणाले, बिग बॉसने निष्ठावंत प्रेक्षक मिळविले आहेत. यंदाच्या ‘बिग बॉस सिझन 12’ मध्ये ‘सासू-सून’, ‘सीता-गीता’, ‘मामा-भांजा’, ‘बडे-छोटे’ अशा जोड्या स्पर्धक म्हणून पहायला मिळतील. बिग बॉसच्या घरात स्पर्धक विविध आव्हाने व परिस्थितीत एकमेकांना सांभाळत 100 दिवस घालवतील.