Tue, Jul 16, 2019 22:15होमपेज › Goa › गोमेकॉ घोटाळा चौकशीचे आदेश : राणे

गोमेकॉ घोटाळा चौकशीचे आदेश : राणे

Published On: May 15 2018 1:36AM | Last Updated: May 15 2018 1:36AMपणजी : प्रतिनिधी

बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) 2016 मध्ये झालेल्या कथित 6.50 लाख रुपयांच्या अफरातफरप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत, असे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी सांगितले.

फ्रान्सिस डिसोझा आरोग्यमंत्री असताना गोमेकॉच्या व्यवहारात सदर घोटाळा झाल्याचा संशय व्यक्‍त करण्यात आला होता. मात्र, आजपर्यंत या व्यवहाराचा तपास करण्यात आला नव्हता. गोमेकॉच्या लेखा विभागात झालेल्या या कथित अफरातफरीतील संशयित अधिकारी व कर्मचार्‍यांची  अजून साधी चौकशीही झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. 

आरोग्यमंत्री राणे म्हणाले की, या अफरातफर प्रकरणी गोमेकॉ  प्रशासनाने अथवा गोमेकॉ डीन यांनी  फारशी चौकशी केली नसल्याचे उघड झाले आहे. तसेच प्रशासनातील कोणत्याही अधिकार्‍याची बदली अथवा बडतर्फीही झाली नसल्याने हे संशयास्पद आहे. यामुळे आपण सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सदर प्रकरणात निष्काळजीपणा आढळल्यास चौकशी पूर्ण होईपर्यंत गोमेकॉच्या डीनच्या वेतन आणि भविष्य निर्वाह निधीवर बंधन घालणार आहे.