Sat, Feb 23, 2019 06:42होमपेज › Goa › ‘दाबोळी’वर सोने, केसरसह 15.5 लाखांचा माल जप्त 

‘दाबोळी’वर सोने, केसरसह 15.5 लाखांचा माल जप्त 

Published On: Dec 12 2017 2:04AM | Last Updated: Dec 12 2017 12:22AM

बुकमार्क करा

दाबोळी : प्रतिनिधी

दाबोळी विमानतळावर कस्टम अधिकार्‍यांनी सोमवार दि. 11 रोजी केलेल्या कारवाईत दोन केरळी  प्रवाशांकडून 11 लाखांचे सोने, 4.3 लाखांचे केसर, विदेशी सिगारेटचे 169 बॉक्स असा एकूण 15.5 लाख रुपयांचा माल जप्त केला.

दुबई व्हाया मस्कतमार्गे गोव्यात दाबोळी विमानतळावर उतरलेल्या ओमन (डब्ल्यूवाय-207) विमानातील दोन केरळच्या  इसमांची झडती घेतली असता एका इसमाच्या बॅगमध्ये 360 ग्रॅम सोने, विदेशी   सिगारेटचे 119 बॉक्स सापडले. तर दुसर्‍या इसमाच्या बॅगमध्ये 4.3 किलो  केसर तसेच विदेशी  सिगारेटचे  50 बॉक्स सापडले. सदर तस्करांनी सोने घड्याळाच्या पट्ट्याला तसेच ड्रेस मटेरियलवर एम्ब्रॉयडरीच्या रुपात शिलाई करून आणले होते.

संशयित इसम कस्टम अधिकार्‍यांना गुंगारा देऊन पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना आयुक्त जी. बी. सांतमानो यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली.