Sat, Jul 20, 2019 11:01होमपेज › Goa › प्रतिमा कुतिन्हो यांना पणजी महिला पोलिसांचा समन्स

प्रतिमा कुतिन्हो यांना पणजी महिला पोलिसांचा समन्स

Published On: Jul 14 2018 12:55AM | Last Updated: Jul 14 2018 12:55AMपणजी : प्रतिनिधी

सांगे येथील अल्पवयीन पीडित  युवतीची ओळख जाहीर केल्याप्रकरणी   प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा  प्रतिमा कुतिन्हो यांना  पणजी महिला पोलिसस्थानकाने समन्स बजावले आहे. कुतिन्हो यांना आज शनिवारी सकाळी 11 वाजता  पणजी महिला पोलिसस्थानकात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

अल्पवयीन पीडित  युवतीची ओळख जाहीर केल्याप्रकरणी कुतिन्हो यांच्याविरोधात  सवेरा ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने तारा केरकर तसेच शिवसेना गोवातर्फे पणजी महिला पोलिसस्थानकात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

पीडित अल्पवयीन मुलीची  भेट घेतल्यानंतर पीडितेच्या पालकांसोबतचे फोटो  सार्वजनिक केल्याचा आरोप  कुतिन्हो यांच्यावर आहे. या प्रकरणी राज्य महिला आयोगाने देखील  पोलिस महासंचालकांकडे तक्रार केली आहे.

दरम्यान, पीडितेची ओळख सार्वजनिक केली नसल्याचा दावा प्रतिमा कुतिन्हो यांनी केला आहे. सरकार विरोधात  आवाज उठवत असल्यानेच  अशा प्रकारे  आपल्यावर  कारवाई केली जात असल्याचाही आरोप केला.