Sat, Mar 23, 2019 16:14होमपेज › Goa › गोवा फॉरवर्ड विद्यार्थी मोर्चाही स्थापणार

गोवा फॉरवर्ड विद्यार्थी मोर्चाही स्थापणार

Published On: Jul 12 2018 1:40AM | Last Updated: Jul 12 2018 1:40AMपणजी : प्रतिनिधी

गोवा  फॉरवर्ड राज्यातील मतदारसंघाबरोबर आता पंचायत स्तरावरही आपले जाळे विणत असून विद्यार्थी मोर्चाही स्थापन करणार, अशी माहिती प्रवक्ते ट्रॉजन डिमेलो यांनी दिली.

 पाटो येथील कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत डिमेलो म्हणाले, की पक्षाची कार्यकारिणीची बैठक मंगळवारी माजोर्डा येथे पार पडली. या बैठकीत पक्षावाढीसाठी अनेक निर्णय घेण्यात आले. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र घेण्यास पक्षाने ठाम विरोध करावा, असा ठराव या बैठकीत घेण्यात आला. गोवा फॉरवर्ड हा स्थानिक पक्ष असून त्याद्वारे स्थानिकांना आणि राज्याला भेडसावणारे प्रश्‍न मांडले जाणार आहेत. भाजप प्रणीत सरकारमध्ये सामील होताना  ‘किमान समान कार्यक्रमा ’खाली दिलेली आश्‍वासने पाळली जाणार आहे. राज्यातील कृषी क्षेत्राला प्राधान्य देऊन नैसर्गिकरित्या शेती करण्यास भर देण्यावर बैठकीत एकमत झाले. नगर नियोजन कायद्यात काही दुरूस्त्या करून त्या स्वीकारण्यात येणार आहे. सीआरझेडच्या मसुद्याबाबत राज्यातील सर्व घटकांना विश्‍वासात घेऊनच त्यावर पुढील निर्णय घेण्यासही बैठकीत मान्यता देण्यात आली. 

पक्षाचे सरचिटणीस गोवा फॉरवर्डचा विद्यार्थी मोर्चा स्थापन करण्यासाठी  तयारी सुरू आहे. येत्या दोन महिन्यांत हा स्वतंत्र विभाग होणार असल्याचे सांगितले.